संगमनेर शहरः पुढारी वृत्तसेवा : महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरातील आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला संगमनेरात जोडे मारो आंदोलन करुन, या कृत्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आ. आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महाड येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महायुतीने छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. नंतर बस स्थानक चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जी मनुस्मृती डॉ. आंबेडकर यांनी जाळली. तीच मनुस्मृती आ. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये जाळली, मात्र मनुस्मृती दहण करण्याच्या नादात अनावधानाने डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्रदेखील त्यांच्याकडून फाडले गेले. हा प्रकार लक्षात येताच आ. आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली, मात्र याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. आ. आव्हाड यांना नेहमी स्टंटबाजी करण्याचे सवय लागली आहे. प्रत्येकवेळी ते अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप पदाधिकार्यांनी केला.
आंदोलनप्रसंगी भाजपाचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, हरिश्चंद्र चकोर, गोकुळ दिघे, सिताराम मोहरीकर, राहुल भोईर, बुवाजी खेमनर, रोहिदास साबळे, दीपक भगत, हरीश वलवे, शरद गोर्डे, सोमनाथ नेहे, रोहिदास गुंजाळ, घनःश्याम भारस्कर, नवनाथ कानकाटे, वरद बागुल, विकास जाधव, महेश मांडेकर, संजय वाक्चौरे, सतीश गोपाळे, श्यामसुंदर जोशी, प्रशांत कोल्हे, रणजीत गायकवाड, ओंकार कातोरे, कमलेश डेरे, गणेश सोनवणे, गणेश पावसे, अरुण थिटमे, विकास गुळवे, सुयोग गुंजाळ, संजय कवडे, ऋतिक निळे, घनः श्याम भोसले, गोपीचंद गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अक्षय भालेराव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुषार ठाकूर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाड येथील आंदोलनादरम्यान त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या छायाचित्रांचा मान राखणे अपेक्षित होते, मात्र स्टंटबाजी करण्याच्या नादात त्यांना विसर पडला, असा आरोप यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, आ. आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला व संगमनेरचे पो. नि. भगवान मथुरे यांच्याकडे केली.
हेही वाचा