कन्नड-सिल्‍लोड महामार्गावर कार-मोटरसायकलचा अपघात, एकजण ठार

file photo
file photo

नाचनवेल ; पुढारी वृत्‍तसेवा कन्नड-सिल्लोड महामार्गावर सारोळा फाटा नजीक (गुरुवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटरसायकलचा जबरदस्त अपघात झाला. यामध्ये मोटरसायकल चालक ठार झाला. भाऊसाहेब पारोबा भडगे (वय ३८ वर्ष रा. जवखेडा खुर्द ता.कन्नड) असे मृताचे नाव आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, कन्नड तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील रहिवासी खासगी पशुवैद्यकीय सेवक डॉ. भाऊसाहेब पारोबा भडगे हे आपली दुचाकी क्रमांक एम.एच.२० एफ.एफ. ०३०५ वरून सारोळा फाटा येथून (गुरुवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जवखेडा खुर्द येथे आपल्या घरी जात होते. यावेळी पाठीमागून मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत भडगे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पिशोर येथील डॉक्टरांनी तपासून डोक्याला गंभीर मार लागल्‍याने त्‍यांची प्रकृती चिंताजनक झाल्‍याने त्‍यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्‍यान घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. आज शुक्रवार रोजी त्‍यांच्या मूळ गावी जवखेडा खुर्द येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्‍यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. सपोनि शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास लालचंद नागलोत ,संजय दराडे करीत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news