पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; मॅनेजरला बेड्या, दोन पीडित तरुणींची सुटका

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्‍या स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून दोन पीडित तरुणींची सुटका केली. याप्रकरणी स्पा मॅनेजर संदीप संतोष तिवारी (वय 23, रा. अक्षय कॉलनी, वारजे माळवाडी) याला अटक केली असून, त्याचा साथीदारआकाश प्रकाश साळवे याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींकडून 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वारजे माळवाडीतील अक्षय कॉलनीत एका इमारतीत ओम स्पा येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली असता, हा प्रकार समोर आला.
अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अण्णा माने, इरफान पठाण, हनुमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news