Drunk And Drive| ड्रंकन ड्राईव्हमध्ये १६८४ परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

'पुढारी'तील वृत्तानंतर कारवाईला वेग
Drunk And Drive
ड्रंकन ड्राईव्हमध्ये १६८४ परवाने निलंबित करण्याचा प्रस्तावFile Photo
Published on
Updated on

शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढत असून, यामध्ये दारू पिऊन वाहन चालवून धडक दिल्याने बहुतांश घटनांची नोंद झाली आहे. त्यातच कल्याणीनगर येथील अपघात, नुकताच मद्यपी चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिलेली धडक आणि एका मद्यपी चालकाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता.

Drunk And Drive
Illegal Liquor| गोवा बनावटीच्या सव्वाकोटींच्या मद्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

त्याच धर्तीवर आता पोलिसांकडून १ जानेवारी ते ३० जूनदरम्यान ड्रंकन ड्राईव्ह करणाऱ्यांचे चालढकल संपली, तब्बल १ हजार ६८४ प्रकरणे परवाना निलंबित करण्यासाठी पाठवले आहेत. याबाबत दैनिक 'पुढारी'ने 'चालढकल संपली; दारू प्यायल्यास परवाना रद्द' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर आता परवाने निलंबित करण्याच्या कारवाईला वेग आल्याचे दिसत आहे. पुणे शहरातील वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई करण्यात येत आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये होणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्याकरिता नाकाबंदी केली होती.

Drunk And Drive
MSEB| पश्चिम महाराष्ट्रातील वीजचोरांना महावितरणचा दणका

२१ मे २०२४ ते ८ जुलैदरम्यान विविध प्रकारच्या वाहतूक नियम भंगाच्या १ लाख ५८ हजार २६९ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तब्बल १२ कोटी २१ लाख ९३ हजारांचा दंड वसूल केला. यामध्ये ड्रंकन ड्राईव्हप्रकरणी १ हजार २३२ चालकांवर कारवाई केली आहे. १ जानेवारी २०२४ ते दि. ३० जून २०२४ दरम्यान १ हजार ६८४ मद्यपी चालकांवर ड्रंकन ड्राईव्हची कारवाई केली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

शहरात मद्यापी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एक जानेवारी ते ३० जून या कालावधीत १६८४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परवाना निलंबित केल्यानंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविताना चालक आढळून आल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात येणार आहे, तशी तरतूद कायद्यात आहे.

रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news