MSEB| पश्चिम महाराष्ट्रातील वीजचोरांना महावितरणचा दणका

एक दिवसात १.५८ कोटींच्या वीजचोऱ्या उघड; गुन्ह्यासाठी दंड व ३ वर्षांपर्यंत कैदेची तरतूद
MSEB
पश्चिम महाराष्ट्रातील वीजचोरांना महावितरणचा दणकाFile Photo

महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी एक दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११५२ ठिकाणी सुमारे १ कोटी ५८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीजतारेच्या हृकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून ८९६ ठिकाणी ९९ लाख ९८ हजार रुपयांची थेट वीजचोरी झाल्याचे आढळून आले.

MSEB
कोल्हापूर : रुंदीकरणातील प्रमुख कामे दीर्घकाळ प्रलंबित!

पुणे प्रादेशिक विभागंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार नुकतीच वीजचोरीविरुद्ध एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये ज्या उद्देशासाठी वीजजोडणी घेतली त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरू असलेले २५६ प्रकार उघडकीस आले असून, त्यांना कलम १२६ नुसार दंड, व्याजासह ५८ लाख १९ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहेत.

तसेच थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे ८९६ प्रकार या मोहिमेत उघड झाले. त्यांना कलम १३५ नुसार वीजचोरीप्रकरणी दंड व वीजवापराचे ९९ लाख ९८ हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहेत. या दोन्ही कलमांनुसार (कंसात रक्कम) पुणे जिल्हा- ६६२ (१ कोटी २८ लाख ८५ हजार), सातारा- ७८ (५ लाख ८४ हजार), सोलापूर २२३ (१२ लाख ५७ हजार), कोल्हापूर ६९ (१ लाख ४८ हजार) व सांगली जिल्ह्यात १२० (९ लाख ४३ हजार) अशा एकूण ११५२ ठिकाणी १ कोटी ५८ लाख १७ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

MSEB
पेडणे बोगद्यात पाणी; कोकण रेल्वे सेवा ठप्प

पश्चिम महाराष्ट्रात दोन वर्षांत ८१ कोटींची वीजचोरी उघड

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वीजचोरीविरुद्ध पश्चिम महाराष्ट्रात एकाच वेळी महिन्यातून एक दिवस विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन वर्षांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत एकूण २३ हजार ५१८ ठिकाणी ८० कोटी ७१ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यात सन २०२२-२३ मध्ये ४४ कोटी ३१ लाख आणि सन २०२३-२४ मध्ये ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघड केल्या आहेत. तर १०७ ठिकाणी संबंधित वीजचोरांविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभागंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार नुकतीच वीजचोरीविरुद्ध एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या उद्देशासाठी वीजजोडणी घेतली त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरू असलेले २५६ प्रकार उघडकीस आले असून, त्यांना कलम १२६ नुसार दंड, व्याजासह ५८ लाख १९ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news