पिंपरी : 24 दिवसांत पालिकेच्या तिजोरीत 44 कोटी जमा

पिंपरी : 24 दिवसांत पालिकेच्या तिजोरीत 44 कोटी जमा

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : मिळकतकर भरण्यास शहरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्ष सन 2023-24 मधील एप्रिल महिन्याच्या 24 दिवसांत मिळकतकर बिलापोटी एकूण 44 कोटी रुपये करसंकलन विभागाकडे जमा झाले आहेत. तब्बल 39 हजार मिळकतधारकांनी वर्षाचे कर भरून सवलतीचा लाभ घेतला आहे.

शहरातील 5 लाख 98 हजार मिळकतींची नोंद पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. यंदा 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट करसंकलन विभागास देण्यात आले आहे. त्यानुसार, मिळकतकर बिलांचे वाटप करण्यास विभागाने सुरुवात केली आहे. महिला बचत गटांच्या मार्फत यंदा बिलाचे घरोघरी वितरण केले जाणार आहे.

शहरातील निम्मे मिळकतधारक स्वत:हून वेळेवर मिळकतकर भरतात. एप्रिल महिन्यात 24 तारखेपर्यंत तब्बल 39 हजार मिळकतधारकांनी बिले भरली आहेत. त्यात 36 हजार 910 निवासी मिळकती, 1 हजार 492 बिगरनिवासी, 105 औद्योगिक, 361 मिश्र, मोकळ्या जागा 101 आहेत. त्यात सर्वांधिक 32 हजार 924 जणांनी ऑनलाइन 35 कोटी 68 लाखांचा मिळकतकर भरला आहे. चार हजार 380 जणांनी रोखीने, 847 जणांनी धनादेश व 7 जणांनी डीडीने बिल भरले आहे.

4 कोटी 67 लाखांचा उपयोगकर्ता शुल्क जमा

महापालिकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षांपासून कचरा संकलन सेवेसाठी मिळकतधारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसुलीस सुरुवात केली आहे. घरटी दरमहा 60 रुपये व व्यावसायिक आस्थापना असलेल्या मिळकतींना आकारमानानुसार शुल्क आहे. या शुल्कापोटी आतापर्यंत 4 कोटी 67 लाख रुपये जमा झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news