

Tax Discount Deadline
पुणे: महापालिकेच्या मिळकतकरातील सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्क्यांची सवलतीची मुदत आज सोमवारी (दि.7) संपत आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज अखेरची संधी आहे.
नागरिकांनी वेळेत मिळकतकराचा भरणा करावा, यासाठी महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोन महिने सर्वसाधारण करात सवलत देण्याची योजना राबविते. त्यानुसार 25 हजारांपर्यंत सर्वसाधारण कराची रक्कम असलेल्या करदात्यांना 10 टक्के तर त्यापेक्षा अधिक रक्कम असलेल्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. (Latest Pune News)
यावर्षी मिळकतकराची बिले एप्रिलऐवजी मे महिन्यात वाटण्यात आली होती. त्यामुळे सवलतीची योजना 30 जून मुदत संपुष्टात आली. मात्र, महापालिकेकडून दि. 7 जुलैपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आज सोमवारी संपत आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप कराचा भरणा केला नाही, त्यांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज अखेरची मुदत आहे. सवलतीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळतकतकर विभागाचे प्रमुख अविनाश संपकाळ यांनी केले आहे.
... तर दोन टक्के दंडाची शास्ती
महापालिकेने दिलेल्या सवलतीची मुदत संपल्यानंतर थकीत मिळकतकरावर दोन टक्के प्रतिमहिना दंडाची शास्ती आकारली जाते. त्यामुळे ज्यांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही, त्यांना 8 जुलैपासून हा दंड लागू होणार आहे.