ग्रीन कॉरिडॉरमुळे पुणे, मुंबईतील वाहतूक समस्या दूर होईल : गडकरी

ग्रीन कॉरिडॉरमुळे पुणे, मुंबईतील वाहतूक समस्या दूर होईल : गडकरी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'आम्ही सुरत, गुजरात येथून ग्रीन हायवे बनवत आहोत; ज्यामुळे पुणे आणि मुंबईमधील वाहतूक समस्या दूर होईल,' असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 'सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'ने आयोजिलेल्या 12 व्या वार्षिक ऑनलाइन आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत गडकरी बोलत होते.

'भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि पुढील पाच वर्षांत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,' असे सांगत गडकरी म्हणाले, 'पायाभूत प्रकल्पांमध्ये नवीन अभियंत्यांच्या सहभागाला खूप वाव आहे. त्यांच्या प्रतिभेचा उपयोग, खर्चाचे विश्लेषण, वेळेचे व्यवस्थापन आणि बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारत मोठी बाजारपेठ

गडकरी म्हणाले, 'इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारत ही सर्वात मोठी ईव्ही बाजारपेठ आहे. ऊर्जेच्या पारंपरिक स्रोताच्या तुलनेत हा सर्वोत्तम पर्याय आहे. आम्ही पेट्रोलऐवजी इथेनॉलचा विशेष प्रसार करीत आहोत. जे पर्यावरणपूरक आणि किमतीतही स्वस्त आहे. आम्ही रेल्वे आणि सागरीसाठी ग्रीन हायड्रोजनचा प्रचार करत आहोत.'

'सिम्बायोसिस'चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, 'गडकरींमध्ये खंबीरपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास आहे. त्यांच्यामध्ये इतरांचे ऐकून घेण्याची इच्छा आहे आणि चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता आहे. गडकरी आणि त्यांचे व्यवस्थापन ज्याला आपण 'गडकरी व्यवस्थापन' म्हणतो ते सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श केस स्टडी आहे.' ब्रिगेडियर (डॉ.) राजीव दिवेकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. विद्या येरवडेकर यांनी आभार मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news