पुणे
पुणे : प्रधानमंत्री पीक विमा; राज्याला पारितोषिक
पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या पुरस्कारामुळे कृषी विभागात आनंदाचे वातावरण आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी केरळमधील कोची येथे हॉटेल ग्रँड हयातमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी 8 व्या राष्ट्रीय आढावा परिषदेचे आयोजन केले आहे.
याच कार्यक्रमात राज्याला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश चौहान यांनी उपस्थित राहण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.