साखरेची दरवाढ; सूर्यफूल, सोयाबीन तेलाचे दर उतरले

साखरेची दरवाढ; सूर्यफूल, सोयाबीन तेलाचे दर उतरले

पुणे : मुबलक कोटा जाहीर झाल्यामुळे साखरेच्या दरात सुरू झालेली घसरण थांबली असून, गेल्या आठवड्यात दरात वाढ झाली. मुबलकतेमुळे पामतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे आणखी पंचवीस रुपयांनी घसरण झाली. यामुळे वनस्पती तूपही स्वस्त झाले. मात्र, दर नीचांकी पातळीवर आल्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या खरेदीचे आकर्षण वाढले असून, दरात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

जून महिन्यासाठी जाहीर झालेला 23.5 लाख टनाचा साखरेचा कोटा या महिन्यातील मागणी लक्षात घेता मुबलक आहे. यामुळे कोट्याच्या घोषणेनंतर दरात घसरण झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात हे चित्र बदलून गेले. स्थानिक बाजारात फारशी मागणी नसली, तरी अन्य राज्यांकडील मागणी वाढल्याने साखरेच्या निविदा उंच दरात जात आहेत.

तसेच सट्टेबाज सक्रिय झाले असून, सट्टेबाजीमुळे भाववाढ सुरू झाली असून, गेल्या आठवड्यात दरात क्विंटलमागे 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3700 ते 3750 रुपयांवर पोहोचला. आवक साधारण असून, मागणी चांगली असल्यामुळे गुळाची दरवाढ कायम असल्याचे सांगण्यात आले.

खाद्यतेलात संमिश्र स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी असल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल तसेच पामोलिन तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. परिणामी, स्थानिक बाजारातही सर्वच खाद्यतेलांचे दर सध्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. पामोलिन आणि सूर्यफूल तेलाच्या दरातील तफावत कमी झाल्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलास मागणी वाढली आहे.

विशेषत्वाने दर नीचांकी पातळीवर आल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेल खरेदीचे आकर्षण वाढले आहे. यामुळे या तेलांच्या दरातील घसरण थांबली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून होते. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यात सर्वच डाळी, कडधान्ये तसेच अन्नधान्याचे दर स्थिर होते.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3700 ते 3750 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर): शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेलः 2500-3250, सरकी तेल 1430-1555, सोयाबीन तेल 1430-1555, पामतेल 1350-1500, सूर्यफूल रिफाईंड तेल 1550-1650,वनस्पती तूप 1450-1880, खोबरेल तेल 2250 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2700-2750 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800- 4200 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.

गूळ : गूळ एकस्ट्रा 4150-4300, गूळ नं. 1 3950-4100, गूळ नं. 2 3825-3900, गूळ नं.3 3700-3800 बॉक्स पॅकिंग 4000-5000 रु. डाळी : तूरडाळ 12500-14500, हरभराडाळ 6000-6300, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 11200-11300 रु. कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु.

साबुदाणा : साबुदाणा नं.1 7500, साबुदाणा नं.2 7000, साबुदाणा नं. 3 6800 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1200 रु. शेंगदाणा :- जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11500-11800, घुंगरू 10500-11000 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल :2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु.

पोहे : मध्य प्रदेश 3800-4000, पेण 3800-4000, मध्यम पोहा-3500-3800, दगडी पोहा 3600- 4200, पातळ पोहा 4500-5100, सुपर पोहा 4300-4600, भाजका पोहा 525, मका पोहा 625- 675, भाजके डाळे 2750-2850, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 900-950, घोटी 430, सुरती 450 रु.

रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1550-1600, मैदा 1550-1600, बेसन : (50 किलोस) 3350-3650 रु.
मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2500 रु.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news