पिंपरी : कोथिंबिरीची जुडी 60 रुपयाला, पावसामुळे पालेभाज्यांचे दर गगनाला

पिंपरी : कोथिंबिरीची जुडी 60 रुपयाला, पावसामुळे पालेभाज्यांचे दर गगनाला
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सतत सुरू असलेल्या पावसामुळे मोशी उपबाजार समिती, पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व चिंचवडगाव येथील भाजी मंडईमध्ये रविवारी पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. कोथिंबिरीची जुडी 60 रुपयांना मिळत होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी पालेभाज्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

12 हजार 670 गड्यांची आवक
मोशी उपबाजारात कोथिंबिरीच्या मागील आठवड्यात 18 हजार 300 जुडीची आवक झाली होती. तर, या आठवड्यात 5 हजार 630 जुडीनी आवक घटली आहे. या आठवड्यात 12 हजार 670 जुडीची आवक झाल्यामुळे कोथिंबिरीचे दर वाढले होते. घाऊक बाजारात 20 रुपयांनी तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रूपयांना गड्डीची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

बटाट्याची आवक निम्म्याने घटली
त्यासोबतच मेथी, शेपू, पालक, मुळा, कांदापातनेही भाव खाल्ला असून, घाऊक बाजारात मेथी 18, शेपू 9, पालक 9, मुळा 10, कांदापात 8 रुपयांना गड्डी मिळत होती. कांद्याची आवक 501 क्विंटल झाली असून, मागील आठवड्यापेक्षा 127 क्विंटलने घटली आहे. मागील आठवड्यात 628 क्विंटल एवढी आवक झाली होती. बटाट्याची आवक 668 क्विंटल झाली असून मागील आठवड्यापेक्षा निम्म्याने आवक निम्म्याने घटली आहे. तरीही, दर मात्र स्थिर आहेत.

फळांची 68 क्विंटल आवक
फ्लॉवर, कोबी यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत 80 ते 90 किंवटलने घटली असून किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलो दर होता. मोशी उपबाजारात फळभाज्यांची आवक 2 हजार 868 क्विंटल, फळांची आवक 68 क्विंटल तर, 27 हजार 270 गड्डी इतकी पालेभाज्यांची आवक झाली आहे.

कराडच्या रताळांची आवक
चवीला गोड असलेली आणि रंगाने गडद लाल असलेली कराडची रताळी बाजारात आली आहेत. यापूर्वी कर्नाटकातील बेळगाव, सटाणा या भागातून रताळ्यांची आवक बाजारात होत होती. आता महाराष्ट्रातील कराडची चविष्ट रताळी ग्राहकांना बाजारात आकर्षित करीत आहेत.

पितृ पंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यातच सध्या पाउस हजेरी लावत असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाणे अवघड बनले आहे. परिणामी आवक कमी होत असल्यामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे दिसत आहे.
पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर
(प्रति जुडी)
मेथी 40
कोथिंबीर 60-65
गावरान कोथिंबीर 80
कांदापात 25-30
शेपू 30
पुदिना 25
मुळा 25
चुका 30
पालक 30

फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 18-20
बटाटा 25-30
लसूण 40
भेंडी 60
गवार 80
टोमॅटो 20-30
दोडका 60
हिरवी मिरची 70
कोल्हापुरी मिरची 80
दुधी भोपळा 60
लाल भोपळा 50
काकडी 40
कारली 80
फ्लॉवर 120
कोबी 100
काटेरी वांगी 100
शेवगा 120
गाजर 50
आले 50
ढोबळी मिरची 80
घोसाळी 60
मटार (गोल्डन) 120
घेवडा (श्रावणी) 70

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news