पुणे : निविष्ठांची किंमत, साठेबाजी, लिंकिंगला बसणार चाप

पुणे : निविष्ठांची किंमत, साठेबाजी, लिंकिंगला बसणार चाप
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात बी-बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्याकरिता कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी
केले आहे. कृषी आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 24 तास संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500, 8446221750, 8446331750 उपलब्ध करून दिला आहे.

तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावरसुद्धा संपर्क करता येईल. या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom. qc. maharashtragmail. com लेा या मेलद्वारे तक्रार पाठवता / नोंदवता येईल. राज्यामध्ये शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. अशावेळी गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बी-बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा वेळेत व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे.

त्यामुळे निविष्ठांबाबत येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे त्यांनी कळविले आहे. तक्रार नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा. तसेच अशी माहिती को-या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉटस्अप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्यांना हे शक्य नाही, त्यांनी मोबाईल क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news