वाहतुकीच्या समस्येवर पालकमंत्र्यांपुढे ‘प्रेझेंटेशन’; उद्योजक, पुणेकर सरसावले

वाहतुकीच्या समस्येवर पालकमंत्र्यांपुढे ‘प्रेझेंटेशन’; उद्योजक, पुणेकर सरसावले
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे पुणेकरांना होणारा त्रास आणि त्यावर कोणते उपाय केले जाऊ शकतात, याचे सचित्र सादरीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष उद्योगपती सुधीर मेहता यांनी पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक सुधारण्यासाठी आणि सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने लोकांकडून सूचना मागवल्या होत्या.

पुण्यातील क्राउडसोर्सने केलेले विचार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सचित्र सदर करून वाहतुकीची कोंडी कमी केली जाऊ शकते, असे पटवून देण्यात आले. क्राउडसोर्स सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार कचरा विलगीकरण, वाहतूक अशा सार्वजनिक विषयांवर मते मांडून काय केले तर काय बदल होतील, याबाबत मते मांडून तोडगा सूचवण्यात आला. पुणेकरांनी खुले आव्हान स्वीकारले आणि कचरा व्यवस्थापनबाबत विचार मांडले.

1) ओला- सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करावी. शक्य झाल्यास सोसायटीमध्ये कचरी व्यवस्थापन झाले तर योग्य होईल. रस्त्यावर कचरा टाकणे कायद्याने बंद करावे. 2) पालिका आयुक्तांनी सुरू केलेली डस्टबिन फ—ी योजना सक्षमपणे राबवावी. 3) रस्ते व दुभाजक रंगवून त्यावर स्पर्धात्मक स्लोगन लिहावेत. 4) उद्यान सुशोभीकरण करून नदीपात्राकडे उभी करावीत. 5) पुण्याचे ऐतिहासिक महत्त्व बघता रस्ते व लाईट, साईन बोर्डदेखील तसेच करावेत. 6) रस्ते व 'पाथ वे' अतिक्रमणमुक्त करून अद्ययावत केंद्रीय पद्धतीने एकसारखे उभारावेत. यासह अनेक मुद्द्यांवर मेहता यांनी प्रेझेंटेशन केले.

यानंतर पाटील यांनी याबाबत लवकरच सर्व विभागांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पालिका प्रशासनाने या विषयावर कामदेखील सुरू केले असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news