पुणे : महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश

पुणे : महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला जाणार की यापुर्वी तयार केलेला आराखडाच प्रशासनाकडून सादर केला जाणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.

इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाशिवाय महापालिका निवडणुका घेऊ नयेत आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर पालिकांचे प्रभाग रचना करण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंबधीचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशानात एकमताने घेण्यात आला होता. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शासनाला पत्र पाठवून प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना प्रभाग रचना करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत.

दरम्यान यापुर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकांनी तीन सदस्यीय प्रभागांचा आराखडा तयार केलेला आहे. तो निवडणूक आयोगाला सादर झालेला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पालिका नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा करणार की त्यातच पुन्हा सुधारणा करणार की जैसे थे आराखडा सादर करणार याबाबत अद्याप स्पष्टता होऊ शकलेली नाही. नव्याने रचना करण्याचे काम प्रशासनाने केल्यास इच्छुकांच्या तयारीला पुन्हा ब्रेक लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news