पुणे : शिवाजीनगर, डेक्कनमध्ये आज दुपारपर्यंत वीजबंद

पुणे : शिवाजीनगर, डेक्कनमध्ये आज दुपारपर्यंत वीजबंद
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणी व इतर दुरुस्तीची कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. 1) सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच रविवारी (दि. 4 डिसेंबर) सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

गणेशखिंड येथील 132 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्राला गणेशखिंड ते चिंचवड आणि गणेशखिंड ते रहाटणी या वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होतो. मात्र, या दोन्ही वीजवाहिन्यांचे मनोरे व तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी महापारेषण व पि. चि. महानगरपालिकेच्या सहकार्याने नवीन मोनोपोल टॉवर उभारण्यात येणार आहे.

त्यामुळे गणेशखिंड 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा 2 टप्प्यांत बंद ठेवला जाणार आहे. यात शिवाजीनगरमधील 28, तर कोथरूड विभागातील 4 वीजवाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील 38 हजार 300 तसेच डेक्कन व जंगली महाराज रोड परिसरातील 8 हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा नाइलाजास्तव बंद ठेवावा लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात गुरुवारी (दि. 1) सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच दुसर्‍या टप्प्यात रविवारी (दि. 4) सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शिवाजीनगर व डेक्कनच्या काही भागांत वीजपुरवठा बंद राहील. यामध्ये एफसी रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग 1, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकि रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलिस लाइन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, शिमला ऑफिस, संचेती हॉस्पिटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता आदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news