वडगाव मावळ : ‘पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वतंत्र व्यवसाय करावा’

वडगाव मावळ : ‘पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वतंत्र व्यवसाय करावा’
Published on
Updated on

वडगाव मावळ: पोल्ट्री फार्मरांनी पोल्ट्री कंपन्या बरोबर करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करण्यापेक्षा स्व:ताचाच स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करावा असे आवाहन पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे यांनी केले. मावळ तालुका पोल्ट्री संघटनेची विशेष सभा वडगाव मावळ येथे अध्यक्ष एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी, संतोष घारे, सोमनाथ राक्षे, संभाजी केदारी, विनायक बंधाले, महेश कुडले, बाबाजी पाठारे, पवन भवार गणपत पोटफोडे, लहु दळवी, मल्हारी ढोरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकेचे संचालक माऊली दाभाडे हे शेतकर्‍यांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. बँक पक्षी व खाद्य तसेच औषधे यासाठी प्राधान्याने कर्ज देणार आहे. याचा लाभ पोल्ट्री फार्मरने घ्यावा असे आवाहन गोपाळे यांनी यावेळी केले. तसेच काही ग्रामपंचायतीने अवास्तव कर (पोल्ट्री कर)आकारणी केली आहे, ती रद्द करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली, कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news