पुणे : घरीच प्रसूती होणार्‍या जिल्ह्यांत गोवरच्या उद्रेकाची शक्यता

पुणे : घरीच प्रसूती होणार्‍या जिल्ह्यांत गोवरच्या उद्रेकाची शक्यता
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत गोवरचा उद्रेक झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लसीकरणाबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. घरीच प्रसूती होणा-या जिल्ह्यांमध्ये आणि लसीकरणाबाबत गैरसमज असलेल्या भागांमध्ये गोवरचा उद्रेक होण्याची शक्यता आरोग्य विभागाने संकलित केलेल्या माहितीतून पुढे आली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान 4815 घरीच प्रसूती झाल्या. त्यापैकी 1804 महानगरपालिका हद्दीत आणि 3011 ग्रामीण भागात होत्या. यामध्ये नंदुरबार (2059), भिवंडी (925), मालेगाव (566) आणि गडचिरोली (329) मध्ये घरच्या घरी झालेल्या प्रसूतींची सर्वाधिक नोंद झाली आहे. त्यापैकी मालेगाव आणि भिवंडीमध्ये सध्या गोवरचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

मालेगाव महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे म्हणाल्या, 'घरी प्रसूती झालेल्या मुलांमध्ये पेंटाव्हॅलेंट आणि गोवर या महत्त्वाच्या लसींचा अभाव असतो. पेंटाव्हॅलंट किंवा गोवरच्या लसीबाबत बरेचदा दुर्लक्ष केले जाते. कारण, लस घेतल्यानंतर ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी सूज आणि वेदना असा त्रास होऊ शकतो. बरेचदा लसीकरणाशी धार्मिक श्रध्दाही जोडल्या जातात.'

घरीच प्रसूती आणि लसीकरण यांच्यातील परस्परसंबंधांचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. लस चुकवणार्‍या प्रत्येक बालकाचा जन्म घरी किंवा रुग्णालयात झाला आहे का, याचा मागोवा घेतला जाऊ शकतो. ब-याच वेळा अपघाती प्रसूती, रुग्णालयात पोहोचण्यासाठी किंवा प्रवेशासाठी लागणारा वेळ अशी घरच्या घरी प्रसूतीमागील कारणे असू शकतात. लसीकरणाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण आणि विश्लेषण सुरू  केले आहे.
                 डॉ. आरती किणीकर, बालरोग विभागप्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय

गोवरची राज्यातील आकडेवारी
वर्ष      उद्रेक      संशयित      निदान

2019    3          1337          153         3
2020    2          2150          193         3
2021    1          3668           92          2
2022   26        6421          503          8

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news