

प्रमोद गिरी :
हडपसर : येथील भोसलेनगर परिसरातील अमरधाम स्मशानभूमीलगत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांच्या सूचनांचा आदर करून महापालिकेने या उद्यानात सकारात्मक बदल केले आहेत. यामुळे सध्या या ठिकाणी नागरिक व मुलांची गर्दी होत आहे.
उद्यानातील हिरवळ, व्यायामाचे साहित्य, बसायला आयकॉन पॅगोडा हे सध्या उद्य नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अमरधाम स्मशानभूमीलगत हे उद्यान असल्याने या ठिकाणी येण्यास नागरिक कचरत होते. कारण बाजूलाच स्मशानभूमी व खुला ओढा असल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती. मात्र, उद्यान निरीक्षक हेमंत जमदाडे यांनी या उद्यानात बारकाईने लक्ष घालून उद्यानातील सर्व गवत काढून पट सुंदर बनविला. एवढेच नव्हे, तर लहान मुलांची खेळणी व ज्येष्ठांसाठी असलेले व्यायामाचे साहित्यदेखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, ओढ्याच्या पाण्याची दुर्गंधी थांबण्यासाठीदेखील उपायोजना करण्यात आल्या आहेत.
यामुळे उद्यानात आता सकाळी व सायंकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी, तसेच खेळण्यासाठी मुलांची गर्दी होत असल्याचे जमदाडे यांनी सांगितले. या उद्यानात आवळा, बेल, तुळस, वड, बांबू, सुबाभळ, सीताफळ, अशोका आणि लिंबाची झाडे लावण्यात आली आहेत. हे उद्यान तीन एकरवर विस्तारले असून, सीमाभिंत बांधण्यासाठी प्रस्तावदेखील देण्यात आला आहे. नागरिकांच्या सेवेसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. उद्यान सुरक्षेसाठी तीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यामुळे परिरारातील सोसायट्यांसह हडपसर-माळवाडी भागातील नागरिकांची या ठिकाणी 'मॉर्निंग वॉक'साठी गर्दी वाढत आहे.
हे उद्यान अमरधाम बाजूला असल्याने नागरिक या ठिकाणी 'मॉर्निंग वॉक'ला येत नव्हते. मात्र, या ठिकाणी नागरिकांच्या सूचनेचा व वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. तसेच, उद्यानाची दररोज स्वच्छता केली जात आहे. यामुळे या उद्यानाकडे नागरिकांचा कल वाढत आहे. यामुळे आम्हालाही काम करायला उत्साह मिळत