

पुणे: पुणे विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी आता ‘रेल्वे कुली’प्रमाणे ‘मीट अँड ग्रीट’ आणि ‘पोर्टर सेवा’ सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना त्यांचे सामान उचलण्यापासून ते चेक-इनपर्यंत पोहचविण्यासाठी मदत मिळणार आहे. विशेषतः जास्त सामान असलेल्या प्रवाशांसाठी आणि ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता सामान वाहून नेण्याची चिंता करावी लागणार नाही. रेल्वेस्थानकांवरील कुली सेवेप्रमाणेच ही सेवा कार्य करेल, जिथे प्रवासी नाममात्र शुल्क देऊन सामान उचलण्यासाठी मनुष्यबळाची नेमणूक करू शकतील. (Latest Pune News)
बाहेरून आल्यावर प्रवाशांचे सामान बॅगेज कन्वेअर बेल्टपासून टॅक्सी आणणण्यापर्यंत आणि विमानतळात प्रवेश करताना विमानतळाच्या प्रवेशापासून सिक्युरिटी चेक-इनपर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे.
कधी-कधी प्रवाशांकडे जास्त सामान असते आणि ते उचलताना त्यांची दमछाक होते. अशावेळी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा खूप चांगली आहे आणि प्रवाशांकडून या सुविधेचे खूप कौतुक होत आहे. आम्ही सर्व विमान प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करीत असल्याचे विमानतळ प्रवाशांनी म्हटले आहे.
अशी असणार ही सेवा.....
पुणे विमानतळातून बाहेर जाणार्या प्रवाशांसाठी बुकिंग केलेले मनुष्यबळ त्यांचे सामान सिक्युरिटी चेक-इन काउंटरपर्यंत पोहचवेल. तसेच, बाहेरून पुणे विमानतळावर येणार्या प्रवाशांसाठी सिक्युरिटी चेक-इन काउंटरपासून त्यांचे सामान टॅक्सी किंवा कॅबमध्ये ठेवण्यापर्यंत ही सेवा उपलब्ध असेल.
रेल्वे स्थानकांवर ज्याप्रमाणे कुलीसेवा उपलब्ध असते, त्याच धर्तीवर पुणे विमानतळावर ‘मीट अँड ग्रीट’ व ‘पोर्टर सेवा’ सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना त्यांचे सामान उचलण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. नवीन टर्मिनलमध्ये या सेवेसाठी दोन विशेष काउंटर्स उभारण्यात आले आहेत, जिथे बुकिंग करून प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ