महिलांच्या किंकाळ्या अन् रक्तांच्या चिळकांड्या; किवळेतील दुर्घटना पाहून पोलिसही गहिवरले

महिलांच्या किंकाळ्या अन् रक्तांच्या चिळकांड्या; किवळेतील दुर्घटना पाहून पोलिसही गहिवरले
Published on
Updated on

पिंपरी : नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी होर्डिंगखाली अडकलेल्या महिलांच्या किंकाळ्या त्यांच्या कानावर पडत होत्या. तसेच, लोखंडी रॉडमधून रक्ताच्या चिळकांड्या उडत असल्याचे पोलिसांना दिसून आले. अथक प्रयत्नांनंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. हातावर पोट असलेल्या मजुरांची निपचित पडलेले देह पाहून पोलिसांनाही क्षणभर गहिवरून आले.

किवळे येथे सोमवार (दि. 17) होर्डिंग कोसळून काहीजण अडकल्याची माहिती वायरलेसद्वारे सर्व विभागांना कळविण्यात आली. त्यानुसार, हिंजवडी, वाकड व देहूरोड येथील वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच, रावेत पोलिसांसह शहरातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. स्पॉटवर आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी लोखंडी रॉडचे तुकडे करून जखमींना बाहेर काढले. त्या वेळी काहींची हालचाल जाणवत होती, तर काहीजण निपचित पडले होते.

दिवसभर काम करून घामाने भिजलेली शरिरे क्षणात रक्ताने माखली होती. मृतांचे नातेवाईक मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत होते.
कोणाच्या घरातील एकमेव आधार असलेल्या कर्त्या महिला, तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष गेला होता. त्यामुळे त्यांनी फोडलेला टाहो उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवत असल्याचे दिसून आले. याबाबत बचावकार्य करणार्‍या पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीदेखील दुःख व्यक्त केले.

पोलिस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालो. त्या वेळी होर्डिंगखाली कितीजण अडकले आहेत. याबाबत नेमकी माहिती नव्हती. अग्निशामक दल जवानांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत होतो. त्या वेळी काहीजण शेवटचा श्वास घेत होते. तर काहीजण विव्हळत होते. आतून जिवाच्या आकांताने ओरडल्याचा आवाज येत होता, हे पाहून मनाला तीव्र वेदना झाल्या.

                  – सुनील पिंजण, वरिष्ठ निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news