तळेगाव ढमढेरे : वेश्या व्यवसाय करणार्‍या हॉटेलवर पोलिसांचा छापा

file photo
file photo

तळेगाव ढमढेरे(ता. शिरूर); वृत्तसेवा : जेजुरी-सासवड रस्त्यावरील बेलसर गावचे हद्दीतील वेश्या व्यवसाय सुरू असणार्‍या लक्ष्मी नारायण लॉजवर जेजुरी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवीत छापा टाकून कारवाई केली. यात वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगाल येथून आणलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेजुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जेजुरी-सासवड मार्गालगत असणार्‍या लक्ष्मी नारायण लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 23) सकाळी सव्वादहाच्या सुमारास लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवला. बनावट ग्राहकाने खात्री करून पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. यात वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगाल येथून आणलेल्या दोन मुली आढळून आल्या. जेजुरी पोलिसांनी लॉज व्यवस्थापक रामा नारायण मोगाविरा (वय 38, रा. हॉटेल जय भवानी, सासवड रोड, वडकी, ता. हवेली) यास ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका करण्यात आली आहे.

जेजुरी पोलिसांनी आरोपी लॉज व्यवस्थापकास अटक करून त्याच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,(1),5,7 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलिस हवालदार नंदकुमार पिंगळे, पोलिस हवालदार एन. आर. दोरके, पोलिस नाईक गणेश नांदे यांनी पार पाडली. तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news