Pune Crime News
खराडीतील बनावट कॉल सेंटरवर छापा; पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखलPudhari file photo

Pune Crime: खराडीतील बनावट कॉल सेंटरवर छापा; पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल

Fake Call Center Busted in Kharadi: तब्बल दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे.
Published on

Police Raid on fake call center

पुणे: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, दारूच्या नशेत रोडवर राडे, महिलांवरील अत्याचार, वाहनांची तोडफोड, कोयता हल्ल्यांसारख्या हिंसक घटनांनी पुणे हादरून गेलं आहे. त्यातच आता शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे.

तब्बल दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. त्या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवीले जात असल्याची माहिती आहे. (Latest Pune News)

Pune Crime News
Pune News: महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएमची तयारी करा; राज्य निवडणूक आयोगाच्या महापालिकेला सूचना

मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल अटक'च्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर अनेकांची चौकशी सुरू आहे. तर मुख्य आरोपी हा गुजरातचा असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे. 

Pune Crime News
Pune News: ओव्हर हेड केबल्सवर पालिकेची कारवाई; 36 किमी परिसरातील काढल्या केबल्स

पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील डेटाची तपासणी सुरू आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करून पुणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news