Katraj Dairy meeting: कात्रज दूध संघ पदाधिकारी बदलावर सोमवारी निर्णय?

संघाच्या घटलेल्या दूधसंकलनावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली नाराजी
katraj Dairy
katraj DairyPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाची बैठक सोमवारी (दि. 25 मे) मुख्यालयात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाच्या वतीने पदाधिकारी बदलाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कात्रज संघाच्या घटलेल्या दूधसंकलनावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त बैठकीत नाराजीही व्यक्त केली असून, पदाधिकारी बदलामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

katraj Dairy
Khadakwasla dam water level: जुलै महिन्यात जाणवू शकतात पाणीटंचाईच्या झळा; जलसंपदा विभागाचा इशारा

बारामती होस्टेलवर शुक्रवारी

(दि. 22) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले व संघाच्या संचालकांची आढावा बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रवादीशी संबंधित बहुतांश संचालक उपस्थित होते, तर संघाचे उपाध्यक्ष अनुपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार दरवर्षी एका तालुक्यातील संचालकांना पदाधिकारीपदी संधी देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली होती.

सध्या पदाधिकारी बदलाचा विषय डिसेंबर महिन्यापासून सुरू होता. त्यावरही प्राधान्याने चर्चा झाली. सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत पक्षाकडून योग्य त्या सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

katraj Dairy
Smart Parking System: कोंडीमुक्त करण्यासाठी नवीन पार्किंग पॉलिसी; स्थायी समितीचे अध्यक्षा अभिषेक बारणे यांची माहिती

कात्रज दूध संघाचे दूधसंकलन 1 लाख 65 हजार लिटर इतके आहे. अगदी तालुका सहकारी दूध संघही तीन लाख लिटरपर्यंत संकलन करीत असताना जिल्हा दूध संघ मागे पडत असल्याची बाब प्रकर्षाने चर्चेत आली. त्यामुळे जादा दूध दर देऊन संकलनवाढ कशी करता येईल, यावर चर्चा झाली.

अध्यक्षपदासाठी अनुभवी संचालकांना संधी

संघाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक (खेड) अरुण चांभारे यांचे नाव प्रथमपासून चर्चेत आहे, तर उपाध्यक्षपदासाठी दिलीप थोपटे, चंद्रकांत भिंगारे, निखिल तांबे, लता गोपाळे यांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबतही उत्सुकता आहे.

मात्र, अनुभवी संचालकांना संधी द्यायची की पूर्वी ठरल्यानुसार तालुकानिहाय संधी द्यायची, याबाबतचा निर्णय पक्षाकडून पुढील आठवड्यात होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. तर पुढील पंचवार्षिक निवडणूक मार्च 2027 मध्ये होणार असल्याने आठ ते नऊ महिन्यांसाठी पद कशासाठी घ्यायचे? असाही सूर काही इच्छुकांमधून बोलून दाखविला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news