PMP bus pass services in Pune
पुणे: पीएमपीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेनुसार ‘फिरते पास केंद्र’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मासिक प्रवास पास सुविधा आता थेट त्यांच्या परिसरात उपलब्ध होणार आहे.
फिरते पास केंद्र या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन देवरे यांच्या हस्ते व पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 5)रोजी मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. नागरिक, विद्यार्थ्यांची सोय तसेच पीएमपीच्या उत्पन्नात वाढ करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे. (Latest Pune News)
फिरते पास केंद्र काय करणार?
सेवा क्षेत्र : फिरते पास केंद्र सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या ग्रामीण हद्दीतील 6 ठिकाणी सोमवार ते शनिवार दरम्यानकार्यरत राहील.
प्रवाशांसाठी सुविधा : विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी मासिक पास काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, पालिकेच्या अनुदानित पास योजनांची माहितीही दिली जाणार आहे.
देयक पद्धती : रोख रक्कम, क्यूआरकोड आणि पी.ओ.एस. मशीनद्वारे पास शुल्क स्वीकारले जाणार आहे.
महामंडळाच्या विविध योजना माहितीचे प्रबोधन : प्रवाशांना पीएमपीच्या उपक्रमांविषयी या फिरत्या पासकेंद्राद्वारे माहिती दिली जाणार आहे.
साप्ताहिक वेळापत्रक व ठिकाणे (सोमवार ते शनिवार वेळ - सकाळी 7.30 ते 1.30).
या दिवशी या ठिकाणी असेल फिरते पास केंद्र...
सोमवार - एस. एन. डी. टी. कॉलेज (मेट्रो स्टेशन)
मंगळवार - कोंढवा गेट (एन. डी. ए. गेट सर्कल)
बुधवार - खडी मशिन चौक (के. जे. व जे. के. कॉलेज)
गुरुवार - राधा चौक (बाणेर - बालेवाडी)
शुक्रवार - हिंजवडी गाव (शिवाजी चौक)
शनिवार - आकुर्डी रेल्वे स्टेशन