पुणे: यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले. त्याकरिता 600 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यंदा मंडळांच्या श्रीगणरायाचे लाईव्ह दर्शन, विविध स्पर्धा त्देरखील आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जोरात आणि जल्लोषात साजरा करू, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन स्वारगेट येथील श्रीगणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. (Latest Pune News)
महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. आमदार हेमंत रासने, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्याच्या गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, अशोक हांडे यांच्या संकल्पनेतून ’मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर झाला. नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले.