पुणे: विघ्नहर्त्या गणरायासह गौरीला निरोप दिल्यानंतर फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक घटली आहे. सोमवारपासून पितृपंधरवडा सुरू झाला आहे. पितृपक्ष पंधरवड्यात धार्मिक कार्यक्रम तसेच शुभकार्य होत नाही.
केवळ पित्रांची पूजा होत असल्याने त्याचा परिणाम फुलांच्या व्यवहारावर झाला आहे. मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने गणेशोत्सवाच्या तुलनेत भावात निम्म्याने घट झाली आहे. रविवारपासूनच फुलांच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उत्पादन खर्चासह वाहतूक खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. (Latest Pune News)
बाजारात जिल्ह्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून आवक होत आहे. दरवर्षी पितृ पंधरवड्यात फुल बाजारात मंदी असते. तसे चित्र यंदाही आहे. तीर्थक्षेत्र, मंदिर भागातून फुलांना मागणी आहे. मात्र, नेहमीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे फुलांचे भाव मंदिच्या छायेत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना कमी प्रमाणात फुले बाजारात विक्रीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. पंधरवड्यानंतर नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. या काळात फुलांची मागणीसह भावातही वाढ होईल, असेही भोसले यांनी नमूद केले.
... असे आहेत दर
झेंडू 10-20 प्रतिकिलो
गुलछडी 80-120 प्रतिकिलो
शेवंती 20-50 प्रतिकिलो
डच गुलाब 30-80 प्रतिकिलो