Meat-Fish Price: गणेशोत्सवानंतर वाढली मासळी, मटण, चिकनला मागणी; दरही वाढले

chicken mutton rates: मासळीच्या दहा, तर चिकनच्या भावात किलोमागे दहा ते वीस रुपयांनी वाढ
fish mutton chicken demand
गणेशोत्सवानंतर वाढली मासळी, मटण, चिकनला मागणी; दरही वाढलेPudhari
Published on
Updated on

demand for fish mutton chicken rises after Ganesh festival

पुणे: गणेशोत्सवानंतर मासळी, मटण आणि चिकनच्या खरेदीकडे पुणेकरांचा कल वाढला आहे. त्यामुळे श्रावण व त्यानंतर गणेशोत्सवामुळे घटलेली मागणी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र आहे.

बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने मासळीच्या भावात दहा टक्क्यांनी तर चिकनच्या भावात किलोमागे दहा ते वीस रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)

fish mutton chicken demand
11th Admission: अकरावी प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ; आज शेवटचा दिवस

मासळी विक्रेते ठाकूर परदेशी म्हणाले, अनंत चतुदर्शीनंतर मासळीला मागणी वाढली आहे. गणेशोत्सव काळापेक्षा दुप्पट म्हणजे 30 ते 40 टन आवक गणेश पेठ येथील मासळी बाजारात झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक असल्यामुळे भाव स्थिर आहेत. विशेषत: कोळंबी, बांगडा आणि बोंबीलला मागणी आहे. तर आंध प्रदेशमधून आवक होणाऱ्या रहू, कतला आणि सिलन मासळीचीही नागरिकांकडून मोठी खरेदी होत आहे.

तर मटणाविषयी प्रभाकर कांबळे म्हणाले, मटणाची मागणी 30 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा असल्याने भाव स्थिर आहेत. मटणामध्ये बोकड, बोलाई आणि खिमाला किलोला 780 रुपये भाव मिळत आहे. तर एक किलो कलेजीसाठी 820 रुपये मोजावे लागत आहेत.

fish mutton chicken demand
Suicide Prevention Day: नैराश्याच्या सावटाखाली बालपण; आत्महत्येकडे वळताहेत पावले

चिकन विक्रेते रुपेश परदेशी म्हणाले की, चिकनला मागणी वाढली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून 300 टनची विक्री होत आहे. तर किलोस चिकनला 230 रुपये, जिवंत कोंबडी 150 रुपये, लेगपीस 300 आणि बोनलेसला 320 रुपये भाव मिळत आहे. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. त्यानंतर नवरात्रौत्सव आहे. नवरात्रौत्सवानंतर मागणीत आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news