Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; पालेभाज्या महागल्या, बिन्स-पावटा अजूनही तेजीत

आवक घटल्याने कोथिंबीर, मेथीसह पालेभाज्यांचे भाव वाढले; मोशी उपबाजारातही मोठी आवक
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 14) गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे प्रति जुडी 30 ते 50 रूपये विक्री होती. बिन्स, पावटा आणि घेवड्याचे दर या आठवड्यातही तेजीतच होते. तर, लसूणचा 100-150 रुपये किलो दर होता. कोथिंबीर, मेथीची जुडी 25-30 रुपयांना मिळत होती. या आठवड्यात आवक कमी असल्याने दर जास्त असल्याचे व्यापाऱ्यंनी सांगितले.

Vegetable
Pimpri Chinchwad Speed Breakers: पिंपरी-चिंचवडमध्ये नियमबाह्य गतिरोधकांचा सुळसुळाट; नागरिकांची कारवाईची मागणी

गवार आणि शेवग्याचा किलोचा दर 60-70 रुपये होता. तर, वांगी, फ्लॉवर 40-50 रूपये किलो दराने मिळत होते. मिरची 60 रूपये किलो, कांदे 100 रुपयांना 5 किलो आणि आले 80-90 रुपये किलो दराने उपलब्ध होते.

Vegetable
Alandi Chain Snatching Case: आळंदीतील सोनसाखळी चोरीप्रकरणी तिघांना अटक; १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे (रुपयात)

रविवारी पिंपरी भाजी मंडईत गवार 70 रुपये किलो, शेवगा 70, टोमॅटो 25, भेंडी 70, फ्लॉवर 50, कोबी 30, मिरची 50, गाजर 30, शिमला 80, लसूण 100-120, आले 70, वांगी 70, काकडी 40, कारले 80, कांदे 20-25, बटाटा 25-30, बिन्स 100, पावटा 100, लाल भोपळा 40, घोसाळी 50, दोडका 70, तोंडली 50, बीट 40, दुधी 50, घेवडा 100.

पिंपरी भाजी मंडई पाले भाज्यांचे दर (रुपयांत) प्रतिजुडी कोथिंबीर 30 रुपये, मेथी 25-30, पालक 25, शेपू 25, राजगिरा 25, पुदिना 15, मुळा 30, चवळई 30, लाल माठ 30, कांदापात 30- 40, करडई 20, आळू पाने 15, आंबट चुका 30, गवती चहा 10.

Vegetable
Pimpri Chinchwad Bribery Case: अनधिकृत बांधकाम प्रकरणात ७० हजारांची लाच; पीसीएमसी बीट निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

फळभाज्यांचे (किरकोळ बाजारातील) :

किलोचे भाव रुपयात

शेवगा 80 रुपये, गवार 70-80, वाटाणा 120, पावटा 110, तोंडली 60, बीट 60, दोडका 80, कारली 70-80, भरताची वांगी 40, भेंडी 80, मिरची 70, फ्लॉवर 50-60, कोबी 40, वांगी 70, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 60, पापडी 90-100, पावटा 120, सुरण 80, मद्रास काकडी 60, आरबी 50, सिमला 80, राजमा 100, बिन्स 120-140, राजमा 120, गाजर 50, आरवी 60-70, रताळी 50-60, टोमॅटो 30-40, काकडी 60, बीट 50.

Vegetable
PCMC General Body Meeting: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंद; सत्ताधाऱ्यांवर नामुष्की

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रुपयांत)

कांदा 9, बटाटा 10, लसूण 70, आले 60, भेंडी 35, गवार 45, टोमॅटो 25, वाटाणा 110, घेवडा 90, दोडका 45, हिरवी मिरची 45, दुधी भोपळा 25, काकडी 25, कारली 35, गाजर 25, फ्लॉवर 15, कोबी 10, ढोबळी 45, वांगी 25, शेवगा 45, घोसाळी 35, लिंबू 75, मका कणिस 50- 60.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)

फळभाजी : 3771, पालेभाजी : 48000 (गड्डी), फळे आवक : 705 कांदा 579, बटाटा 715, आले 68, लसूण 4, भेंडी 114, गवार 43, टोमॅटो 327, वाटाणा 9, घेवडा 8, दोडका 11, हिरवी मिरची 152, दुधी भोपळा 47, काकडी 193, कारली 20, डांगर 94, गाजर 118, फ्लॉवर 304, कोबी 236, वांगी 204, ढोबळी 77, बीट 14, शेवगा 50, लिंबू 56, मका कणीस 126, तोंडली 12, रताळी 19.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news