

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोच्या कामामुळे रस्ता बंद केल्याने सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक मुख्य रस्त्यावर वळविल्याने नाशिक फाटा चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला.
यामुळे वाहनचालक या कोडिंत अडकून पडले. शुक्रवारी नाशिक फाटा चौकात(दि. 17) हा प्रकार घडला. या वाहतुककोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर वाहनांची दिवसरात्र मोठी वर्दळ असते. दरम्यान, पुण्याहून निगडीच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे.
शुक्रवारी या रस्त्यावर मेेट्रोचे काम सुरु असताना, रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे निगडीच्या दिशेने जाणारी वाहने मोठया प्रमाणात अडकून पडली.
दुसर्या रस्त्यावर ती वाहतूक वळविण्यात आली; मात्र, हा रस्ता अरुंद असल्याने त्यातून वाहने काढणे वाहनचालकांना मुश्किल झाले. या कोडिंत रुग्णवाहिकाही अडकली.
अखेर वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेत रूग्णवाहिकेस मार्ग मोकळा करून दिला.