पिंपरी : वाचन प्रकल्पामुळे वाढली गोडी; स्वाधार संस्थेचा उपक्रम

Pimpri: Sweetness increased due to reading project; An initiative of Swadhar Sanstha
Pimpri: Sweetness increased due to reading project; An initiative of Swadhar Sanstha
Published on: 
Updated on: 

पिंपरी : वर्षा कांबळे : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी व सवय निर्माण करावी आणि त्यांनी एक स्वावलंबी वाचक बनावे, या उद्देशाने 'स्वाधार' संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या 28 आणि खासगी 29 शाळांमध्ये अक्षर स्पर्श शाळा वाचन प्रकल्प राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळामध्ये ही वाचनालय सुरू असून त्याचा लाभ आता सर्व विद्यार्थी घेत आहेत.

आजकालच्या विद्यार्थ्यांना वाचता येते परंतु वाचलेले सगळेच समजते असे नाही. त्यामुळे त्याला स्वावलंबी वाचक असे म्हणता येणार नाही आणि विद्यार्थ्यांला त्याच्या समजण्याच्या कुवतीनुसार वाचन मिळाले नाही तर हळूहळू त्याचे वाचन कमी कमी होत जाते. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणे हे आव्हान आहे. आणि त्यानुसार ही संकल्पना उतरविण्यात आली आहे.

गेली चौदा वर्षे महापालिकांच्या शाळामध्ये हा वाचन प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत गट पाडून त्यांच्या वाचनाच्या स्तराप्रमाणे पुस्तके वाचायला दिली जातात. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरी पुस्तके वाचण्यास दिली जातात. शाळेत आठवड्यातून एकदा हा वाचन तास घेतला जातो.

संस्थेतर्फे याठिकाणी काम करणारे कर्मचारी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके देतात. पाऊण तास पुस्तक वाचन त्यानंतर 20 मिनिटे भाषिक खेळ, आणि पाच मिनिटे गप्पा गाणी असे तासाचे स्वरुप असते. या कर्मचार्‍यांना संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.

यानंतर दर महिन्याला पुस्तकातील धड्यातील आकलन उतारा दिला जातो. हा प्रकल्प जून महिन्यात सुरु होतो, त्यावेळी विद्यार्थ्यांची एक क्षमता चाचणी घेतली जाते. तसेच वर्षाच्या शेवटी देखील एक क्षमता चाचणी घेतली जाते.

कोविड काळात आम्ही मुलांच्या ऑनलाइन संपर्कात होतो. यामध्ये व्हॉट्सअपचा तीन मुलांचा एक गट असे अडीचशे ते तीनशे गट तयार केले होते. काही मुलांना पुस्तके हातात देता येत नव्हती. तेव्हा आम्ही पुस्तकाशी संबंधित गोष्टी तयार केल्या. ज्या फ्लॅश कार्डच्या आधारे मुलांपर्यंत पोहचविल्या. आता प्रत्यक्ष पुस्तके मिळाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पहायला मिळाला. दोन वर्षाच्या कालावधीनंतर मुलांना पुस्तके वाचन करायला मिळत आहेत. मुलांना पुस्तकांच्या रुपात आम्हाला काही देता येते याचे समाधान आहे.
-स्वाती काणेकर, समन्वयक, स्वाधार वाचन प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news