Pimpri Pendhar Leopard CCTV: पिंपरी पेंढारमध्ये खडकमाळ परिसरात तिन्ही बिबट्यांची वर्दळ; नागरिकांत भीतीचे वातावरण

अरुण पोटे यांच्या घराजवळ मध्यरात्री तीन बिबटे सीसीटीव्हीत कैद; वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी
अरुण पोटे यांच्या घराजवळ मध्यरात्री तीन बिबटे सीसीटीव्हीत कैद; वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी
पिंपरी पेंढारच्या खडकमाळ येथील अरुण पोटे यांच्या घराजवळ घिरट्या घालणारे तीन बिबटे.Pudhari
Published on
Updated on

नारायणगाव : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) हद्दीतील खडकमाळ येथील अरुण पोटे यांच्या घराजवळ गुरुवारी (दि. 6) मध्यरात्री 12 ते अडीच वाजण्याच्या दरम्यान तीन बिबटे घराभोवती फिरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या ठिकाणी वन खात्याने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.(Latest Pune News)

अरुण पोटे यांच्या घराजवळ मध्यरात्री तीन बिबटे सीसीटीव्हीत कैद; वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी
Ambegaon Junnar Leopard Attack: ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!’ — आंबेगावात शेतकऱ्याचा थरार; जुन्नरमध्ये तरुणावर बिबट्याचा हल्ला

पिंपरी पेंढार परिसरात बिबट्यांचा वाढता वावर वाढला असून, अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी या परिसरात दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

अरुण पोटे यांनी सांगितले की, ‌‘आमच्या घराला 3 बिबटे मध्यरात्री घिरट्या घालत होते. परिसरातील पोल्ट्री व कोंबड्यांच्या वासामुळे बिबटे वारंवार येत आहेत, तरी वन विभागाने त्याची दखल घेतली नाही. एखाद्या माणसाचा जीवही जाऊ शकतो.‌’

अरुण पोटे यांच्या घराजवळ मध्यरात्री तीन बिबटे सीसीटीव्हीत कैद; वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी
ICAI Pune CA Students Conference: पुण्यात सीए विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परिषद; प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी पेंढार येथील अरुण पोटे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्याची व्यवस्था शुक्रवारी (दि. 7) रात्री उशिरा किंवा शनिवारी (दि. 8) सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण होईल. तसेच, रात्रीच्या वेळेला गस्त घालणारी वन विभागाची वाहने त्या भागात फिरवली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news