Pimpri News : झाडे बनली धोकादायक; उपाययोजनाची नागरिकांची मागणी

Pimpri News : झाडे बनली धोकादायक; उपाययोजनाची नागरिकांची मागणी

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : येथील माहेश्वरी चौकातील पदपथाला लागून असलेल्या झाडाच्या बुंध्याला मधोमध चीर पडल्याने हे झाडधोकादायक बनले आहे. हे झाड कधीही पडण्याची दाट शक्यता असून, महापालिका उद्यान विभागाने याकडे तातडीने लक्ष देउन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिक विजय भोसले, तानाजी ढमाळ यांनी केली आहे.

अपघाताची भीती

नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकात रस्त्याच्या कडेला एका वॉशिंग सेंटरजवळ टोलेजंग झाड आहे. या झाडाच्या बुंध्याला दिवसेंदिवस मोठी चीर पडल्याने ते कधीही पडण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी सकाळी जोरदार वार्‍यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात चीर पडत असल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले. या वेळी नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्वरित महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांशी संपर्क साधला.

प्रशासनाचे दुर्लक्ष

या परिसरात चार व्यावसायिक पत्रा शेड आणि वॉशिंग सेंटर असून, या रस्त्यावर शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यालयांची कायम रेलचेल सुरू असते. शिवाय, रात्री अपरात्री येथील झाड पडून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. तसेच वाहनांचेही मोठे नुकसान होऊ शकते. महापालिकेच्या उद्यान विभागाने याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत नुकतीच माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित अधिकारी यांना त्वरित माहिती देऊन, मी स्वतः याठिकाणची पाहणी करणार आहे. याशिवाय, हे झाड छाटून कोणतीही दुर्घटना घडून येणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे आदेश संबंधितांना देणार आहे.

– राजेश वसावे, उद्यान अधीक्षक

गेली काही दिवसांपासून येथील झाडाच्या बुंध्यामधील चीर वाढत आहे. यामुळे हे झाड धोकादायक बनले आहे. या रस्त्यावर शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यालयांची वर्दळ असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

– विजय भोसले, व्यावसायिक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news