Pune News : कोबीच्या शेतात मेंढपाळांचा मुक्काम | पुढारी

Pune News : कोबीच्या शेतात मेंढपाळांचा मुक्काम

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : कोबीला सध्या मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावामुळे कोबी उत्पादक शेतकर्‍यांनी कोबीचे पीक सोडून दिले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात अनेक कोबीच्या शेतांमध्ये सध्या शेळ्या-मेंढ्यां चरत आहेत. तर मेंढपाळांचाही मुक्काम शेतांमध्ये वाढलेला दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोबीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. बाजारभाव चांगला मिळेल, या आशेने अनेक शेतकर्‍यांनी कोबीचे पीक घेतले होते.

परंतु दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कोबीला किलोला दोन ते तीन रुपये मिळत आहे. या दरातून पिकासाठी गुंतविलेले भांडवल दूर, परंतु काढणीसाठी मजुरी, वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
या परिसरात चांडोली, थोरांदळे, खडकी, नागापूर, वळती, रांजणी, शिंगवे, पारगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी कोबीचे पीक सोडून दिले आहे. त्यामुळे मेंढपाळांनी शेळ्या-मेंढ्यांसहीत कोबीच्या शेतात तळ बसवले आहेत.

हेही वाचा :

Back to top button