Pimpri News : शहराची हवा दूषितच

Pimpri News : शहराची हवा दूषितच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हवेतील प्रदूषणाबाबत अभ्यास करणार्‍या संस्थेच्या आकडेवारीवरून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या श्रेणीनुसार अत्यंत खराब आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढले आहे. दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे वायू व ध्वनी प्रदूषणात मोठी भर पडली आहे.

भोसरी परिसरात एक्यूआर 394

पिंपरी-चिंचवड शहराचा एअर क्लालिटी इंडेक्स (एक्यूआर) धोकादायक पातळीवर आहे. भोसरी परिसरात तो 394 दर्शविण्यात आला आहे. या स्तरावरील हवेची गुणवत्ता अतिशय घातक ठरू शकते. देशात सद्यस्थितीत सर्वांच जास्त प्रदूषण दिल्ली पाठोपाठ मुंबई व अहमदाबाद या शहरात आहे. त्या शहराच्या बरोबरीत हे प्रदूषण आहे.

वाहनांच्या धुरामुळेही हवेची गुणवत्ता ढासळली

हिवाळा असल्याने हवेतील धूलिकणांच्या घनतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता घसरत आहे. दिवाळीमध्ये फोडले जाणारे फटाके व आतषबाजी, बांधकामातून निघणारी धूळ, खाणीतून काढले जाणारे दगड, क्रशर मशिन, खोदकाम, तसेच, वाहनांचा धूर, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचा धूर आदींमुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे. तीनशेहून अधिक एक्यूआर वयस्क, लहान मुले यांच्या श्वसनाचे विकास असणार्‍यांना त्रासदायक आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. सफर या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 13 नोव्हेंबरला भोसरी परिसरात सर्वाधिक एक्यूआय 394 होता. निगडी परिसरात एक्यूआय 338 नोंदविला आहे.

प्रदूषणाची कारणे

सध्या थंडी वाढली आहे. त्यामुळे हवेतील कोरडेपणाही वाढला आहे. या दिवसात धूलिकण वर न जाता हवेतच तरंगतात. त्यामुळे हवेतील धूलिकणांची वाढती घनता मानवी आरोग्यास धोकादायक मानली जाते. या घनतेमध्ये फटाके व आतषबाजीची भर पडते. शिवाय परिसरात सुरू असलेल्या बांधकामे, खाणीतून काढले जाणारे दगड, क्रशर मशिन, खोदकाम यामुळे धूलिकण मोठ्या प्रमाणात तयार होतात. ते प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news