Pimpri News : रावेत येथे उभारणार स्वतंत्र अग्निशमन केंद्र

Pimpri News : रावेत येथे उभारणार स्वतंत्र अग्निशमन केंद्र

Published on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. आगीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शहरभरात केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. रावेत केंद्रासाठी 30 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शहराची लोकसंख्या 30 लाखांवर गेली आहे. उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी नागरिकांचा पिंपरी-चिंचवड शहराकडे ओढा असल्यामुळे शहराच्या चारी बाजूस लोकवस्ती वाढत आहे.

लोकसंख्या वाढत असल्याने शहराची लोकसंख्या फुगत आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी 18 अग्निशमन केंद्रांची गरज आहे. सध्या केवळ 8 केंद्र सुरू आहेत. आणखी दहा केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रावेत भागात घडणार्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निगडी, रहाटणी अग्निशमन केंद्रांवर अवलंबून रहावे लागते. रावेत येथील सर्व्ह क्रमांक 96 येथील जलशुद्धीकरण केंद्राचे आरक्षण असलेल्या जागेतील 1 एकर जागेत स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम, आरसीसी वर्क, प्लोरिंग वर्क, दरवाजे व खिडक्या बसविणे, आतील व बाहेरील प्लास्टर व रंगकाम, अंतर्गत रस्ते, अंतगर्त पावसाळी पाण्याची नलिका, अंतर्गत पाणीपुरवठा व ड्रेनेजवाहिनी, विद्युतीकरण, अग्निशनम व्यवस्था आदी कामासाठी सुमारे 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयुक्त सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सहा फायर फायटर दुचाकी

महापालिकेच्या वतीने अग्निशमन विभागाच्या ताफ्यामध्ये जून 2022 पासून सहा अग्निशमन मोटारसायकलींचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग शहरातील अरुंद रस्ते, गल्लीमधील आगी, मार्केट परिसर अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या गाडीमध्ये घटनास्थळी 40 लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. सोबत प्रथमोपचार पेटी, अग्निशमन वायू, ध्वनिक्षेपक यंत्र असे साहित्य आहे.

लोकवस्ती वाढल्याने रावेत भागासाठी अग्निशमन केंद्र

रावेत, किवळे, पुनावळे भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. अनेक हाऊसिंग सोसायट्या तयार झाला आहेत. तसेच, अनेक मोठमोठी दुकाने, शॉपींग कॉम्प्लेक्स आहेत. लोकवस्ती व परिसरात विकास झाल्याने आगीसारख्या दुर्घटना घडू शकतात. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी रावेत भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news