देहूरोडकडून इंदोरीमार्गे आणि देहूरोडकडून देहूगाव, सांगुर्डी ते कॅडबरी कंपनीमार्गे कुंडमळा आणि कान्हेवाडीकडे जावे लागत होते. 25 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार रुपलेखा ढोरे यांनी या लोखंडी पुलाला जोडून पुढे मिसाईल प्रोजेक्टच्या भिंतीपर्यंत समांतर असा सिमेंटमध्ये पूल जोडला होता. त्यामुळे नागरिक ये-जा करू शकत होते; परंतु सध्या हा पूल कमजोर झाला असून, एका ठिकाणी किमान सात ते आठ फूट लांबीपर्यंत या पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. त्याच्या सळ्या उघड्या पडल्या असल्यामुळे एखाद्याचा चुकून तोल गेला तर जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पुलाचे ऑडिट करून हा पूल किमान सात ते आठ फुटांचा तयार करावा. तसेच, बोडकेवडी आणि कान्हेवडीला जोडणार्या बंधार्याचे देखील दुरुस्ती करून त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.