Pimpri News : रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे कोंडीत भर

Pimpri News : रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे कोंडीत भर
Published on
Updated on

हिंजवडी : मेट्रोचे काम पूर्णत्वास नेण्याच्या शासनाच्या प्रयत्नात आता अडथळे वाढत आहेत. कारण आयटी पार्कला जोडणारे अनेक रस्ते अपूर्ण आहेत. काही रस्ते केवळ कागदावर असून त्यांचे कामदेखील सुरू झाले नाही. तर, काही रस्ते अर्धवट असल्याने त्या रस्त्याचा पूर्णपणे वापर करण्यात येत नाही. त्यामुळे मेट्रोचे काम पूर्ण होण्याअगोदर हे रस्ते पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.

वाहतूककोंडी नित्याची

यातील महत्त्वाचा हिंजवडी-माण आयटीनगरीमध्ये येण्यासाठी असलेला भूमकर वस्ती-हिंजवडी रस्त्यावरील अडथळा काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. या परिसरातून आता मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. परंतु, हिंजवडी-माण रस्ता अरुंद आहे. तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. सकाळी आणि संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी नित्याचा विषय आहे. माण-म्हाळुंगे रस्तादेखील काही शेतकर्र्‍यांच्या विरोधामुळे पूर्ण झालेला नाही.

रिंग रोडदेखील कागदावरच

भविष्यात जर हा रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाला तर फेज 2 आणि फेज 3 येथील पूर्ण वाहतूक या रस्त्याहून वळविणे शक्य होणार आहे. यासह पीएमआरडीएच्या वतीने होणार्‍या माण-मारुंजी येथून जाणारा प्रस्तावित रिंग रोडदेखील अद्याप कागदावर आहे. भविष्यातही हा रस्ता कधी होईल याची स्पष्टता नाही. यासह वाकडहून जोडला जाणारा रस्तादेखील अपूर्ण आहे. तर, वाकड येथील सूर्या हॉस्पिटल ते विप्रो सर्कलजवळ जोडला जाणारा रस्ता व सुरतवाला कॉम्प्लेक्स हा प्रस्तावित रस्ता याचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कामास अद्यापही सुरुवात झाली नाही.

  • पीएमआरडीएकडे असलेल्या या रस्त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनीवर आरक्षण ठेवण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास वाकड ते थेट फेज 1 कडे रस्ता जोडला जाईल. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहने हिंजवडी गावातून न जाता बाहेरील बाजूने आयटीतील वाहने थेट वाकडमध्ये जातील. या त्यामुळे वाहतूक कोंडी
    कमी होईल.
  • वाहतूक समस्या ही नित्याची बाब असली तरीही मेट्रोच्या कामामुळे होणारा त्रास हा अधिक आहे. नव्याने होणार्‍या कामाबाबत अनेकदा माहिती संबंधित विभागांना मिळत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासन, वाहतूक विभाग यांना पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी वाहतूककोंडी ही कायम होत असते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news