Pimpri News : ‘वायसीएम’मध्ये बोगस पावत्यांद्वारे भ्रष्टाचार

Pimpri News : ‘वायसीएम’मध्ये बोगस पावत्यांद्वारे भ्रष्टाचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील अत्यावश्यक विभागाच्या कॅश काउंटरवर एका खासगी कंपनीच्या कंत्राटी कर्मचार्‍याने गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून बोगस पावत्यांद्वारे हजारो रूपयांचा भ्रष्टाचार केल्याची माहिती वायसीएम प्रशासनाने दिली.

हा कंत्राटी कर्मचारी डिसेंबर महिन्यापासून दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत रूग्णालयातील कॅश काउंटरवर काम करीत होता. रूग्णांचे नातेवाईक रक्त, प्लेटलेट आदींसह इतर बाबींसाठी या काउंटरवर कॅश जमा करीत होते. दररोज हजारो रूपयांच्या पावत्याद्वारे
रोख रक्कम रूग्णालयात जमा होत होती. मात्र या कर्मचार्याने बोगस पावत्या बनवून वायसीएममध्ये लाखो रूपयांचा घोळ करत, स्वतः चा खिसा भरला असून, एकूण जमा रकमेत तफावत आढळल्याची माहिती वायसीएम प्रशासनाने दिली.

परंतु कंत्राटी तत्वावरील चतुर्थ श्रेणीतील मदतनीसाला लिपिक किंवा लेखापाल पदाची जबाबदारी कशी दिली. गेल्या नऊ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता; मात्र त्यावर अद्यापपर्यंत गुन्हा दाखल का केला नाही, असा प्रश्न शहरातील 'आप' चे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी उपस्थित केला आहे.

कर्मचारी संख्या कमी असल्याने मदतनीस हे कॅश कांउटरचे काम पाहत आहेत. जानेवारी महिन्यापासून हा मदतनीस काउंटरवर काम करीत आहे. जानेवारीपासून वायसीएममधील बिलाच्या रकमांची तपासणी सुरू असून, यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्या कर्मचार्‍याने बोगस पावत्यांद्वारे वायसीएमची आर्थिक फसवणूक केली आहे.

– डॉ. राजेंद्र वाबळे, वायसीएम अधिष्ठाता, पिंपरी.

रूग्णालयातील एका खासगी कंपनीच्या कर्मचार्‍याने हा घोटाळा केला असून, वायसीएम प्रशासन त्याच्यावर कोणतीही कारवाई दिसून येत नाही. याबाबत आम्ही महापालिका आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना विनंती करून वाबळे यांच्या निलंबनाची मागणी करतो आहोत.

– चेतन बेंद्रे, आप शहराध्यक्ष, पिं. चिं. शहर.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news