Pimpri News : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Pimpri News :  विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
Published on
Updated on

पिंपरी : शहर भाजप कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी मोरवाडी रस्त्यावर मध्येच अडवला. दरम्यान, शहर भाजप महिला अध्यक्षा सुजाता पलांडे, माजी नगरसेवक वैशाली खाडे आदींनी मोर्चास सामोरे जात त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मोरवाडी चौकातील अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मोर्चाला सुरुवात केली. मानधन नको दयेचे, वेतन हवे हक्काचे, भाऊबीज नको दयेची, बोनस हवा हक्काचा, आम्हांला टेन्शन-तुम्हांला पेन्शन, आम्हांला पेन्शन मिळालीच पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले की, सातत्याने आंदोलन करूनही अंगणवाडीताईंना पुरेसे मानधन मिळत नाही. आता आपल्या हक्कांसाठी त्यांनी निकराची लढाई करायचे ठरवले आहे. आज आम्ही सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर थांबलो आहोत. पण प्रश्नन सुटल्या लोकशाही मार्गाने कार्यालयात येऊन ठिय्या देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
शैलजा चौधरी, सुनंदा साळवे, शकुंतला घोरपडे, उर्वशी गाढवे, अनिता आवळे या अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांसह रिक्षा पंचायतीचे पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी अशोक मिरगे, काशिनाथ शेलार, कष्टकरी महासंघाचे नेते काशिनाथ नखाते यांनीही पाठिंबा दिला. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनीही लवकरात लवकर अंगणवाडीताईंचे प्रलंबित प्रश्न सोडवावे, असे आवाहन केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news