पिंपरी : टपरी चालकावर खुनी हल्ला

पिंपरी : टपरी चालकावर खुनी हल्ला
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सिगारेटचे पैसे मगितल्याच्या रागातून सहा जणांनी मिळून टपरीचालकावर खुनी हल्ला चढवला. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री खराबवाडी येथे घडली. अभिषेक सुनील पानसरे (19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांनी मंगळवारी (दि. 26) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय दुधांबे, अजय हळुंदे, रोहन जगताप, गौरव कचवे, हरदिल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पान टपरी आहे. त्यांचा मित्र सुनील कुरटकर हा टपरी चालवतो. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांच्या टपरीवरून महागड्या सिगारेट घेतल्या आणि त्याचे पैसे न देता निघून गेले.

हा प्रकार सुनील यांनी फिर्यादी यांना सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना याबाबत विचारणा करून खराबवाडी येथील जंबूकर यांच्या विहिरीजवळ बोलावले.

तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. 'आज अभिषेक याला जिवंत सोडायचे नाही.

याला इथेच खल्लास करायचे असे म्हणून फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला,' असे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news