पिंपरी : किरकोळ वादातून तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : किरकोळ वादातून तरुणावर खुनी हल्ला
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादावरून पाच जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला चढवला. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री पावणे बाराच्या सुमारास देहू-आळंदी रोड मोशी येथे घडली. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

अजय युवराज बोत्रे असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश काशिनाथ तांबे (23, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, ऋषिकेश यांचा मित्र शुभम सस्ते, किशोर पवार यांच्यासह अन्य तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र अजय हे मोशी येथील चौधरी ढाबा येथे गेले होते.

त्यावेळी किरकोळ कारणावरून आरोपी शुभम याच्यासोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला. या वादातून आरोपींनी 'तुला जास्त मस्ती आली आहे.

थांब तुला खलास करून टाकतो' असे म्हणून लाथाबुक्क्यांनी आणि खुर्च्यांनी, लाकडी बांबूने अजय यांच्या छातीवर, पोटावर, हातावर, डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. या मारहाणीत अजय हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news