श्री रामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

श्री रामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
Published on
Updated on

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रभू श्रीराम यांच्याबाबत अभद्र वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला. आव्हाडांना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन पत्र तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव आवताडे यांना देण्यात आले.

यावेळी तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोक दाभाडे पाटील,माजी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील , प्रदेश संयोजक सचिन टकले,खजिनदार विनायक भेगडे , संघटन मंत्री रविंद्र साबळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा परदेशी, रंजनी ठाकुर,माजी नगरसेविका शोभा भेगडे सरचिटणीस निर्मल ओसवाल, उपाध्यक्ष सचिन जाधव , हिम्मत पुरोहित,सागर शर्मा,मुदुला भावे यांच्यासह तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news