Pimpri : बड्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने प्रकल्प धूळखात..

Pimpri : बड्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने प्रकल्प धूळखात..

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) करण्यात आले. मात्र, महापालिकेचे अनेक प्रकल्प व कामे उद्घाटन व भूमिपूजनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, बड्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने लोकांच्या सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

करदाते सुविधांपासून वंचित

शहरातील करदात्या नागरिकांसाठी महापालिका विविध नागरी सुविधा निर्माण करते. मात्र, त्यांचे वेळेत उद्घाटन किंवा लोकार्पण न झाल्यास त्या सुविधा लाभ नागरिकांना घेता येत नाही. विलंब झाल्यानंतर त्या सुविधेचा लाभ घेण्यास नागरिकांना रस राहत नाही किंवा उत्साह मावळतो. त्यामुळे प्रकल्प किंवा कामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ त्यांचे उद्घाटन व लोकार्पण करणे गरजेचे आहे.

नागरिकांची नाराजी

पुणे शहरात तसेच, पुणे जिल्ह्यात तसेच, पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रम, सभा व मेळाव्याना हजेरी लावणारे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार तसेच, बड्या नेत्यांना महापालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यास वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक वेळा महापालिकेस नियोजित कार्यक्रम स्थगित करावे लागले आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांनी केलेली तयारी आणि दिलेला वेळ वाया जात आहे. तसेच, करदात्या नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी शहरातील आठ प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन तसेच, लोकार्पण केले. महापालिकेच्या भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रकल्प व कामांचे उद्घाटन व भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) करण्यात येणार होते. त्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन तयारीही केली होती. परंतु, ऐनवेळी त्यांनी वेळ न दिल्याने त्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन पुन्हा लांबणीवर पडले आहे

या कामांचे उद्घाटन, भूमिपूजन रखडले

दीपस्तंभ प्रकल्प, जैववैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, कुदळवाडी-जाधववाडी येथील सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प, चर्‍होली येथील गृहप्रकल्प, चिखलीतील टाऊन हॉल, हॉटेल वेस्टपासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प, मोशी येथील रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन, मोशी कचरा डेपोतील कचर्‍याचे बायोमायनिंग टप्पा दोनचे भूमिपूजन होणार होते. बड्या नेत्यांची वेळ न मिळाल्याने हे प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडले आहेत. तसेच, पिंपरी ते निगडी मेट्रो कामाचे भूमिपूजनही रखडले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news