Pimpri Crime News : धारदार हत्याराने वार करत एकाचा खून
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : धारदार हत्याराने वार करत दोघांनी मिळून एकाचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि. 23) सकाळी कासारवाडी येथील मेट्रो स्टेशनजवळ झाडाखाली घडली. गौतम सोनकांबळे, असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी आसिफ इब्राहिम पटेल (26, रा. कासारवाडी) सादिक मियासाब शेख (23, रा. पिंपळे गुरव) या दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी मयत सोनकांबळे यांचा चुलत भाऊ शंकर सिद्धाराम कांबळे (39, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून अज्ञात कारणावरून गौतम कांबळे याला शनिवारी सकाळी गाठले. कासारवाडी येथील मेट्रो स्टेशनजवळ असताना गौतम याला बेदम मारहाण केली. तसेच, धारदार हत्याराने हात, पाय, पाठ आणि डोक्यावर वार करत त्यांचा खून केला. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास भोसरी पोलिस करत आहेत.
हेही वाचा

