

पुणे : मूळव्याध, भगंदर, फिशर आणि जुनाट बद्धकोष्ठता या आजारांची नावे वेगवेगळी असली तरी या समस्येकडे नेहमीच अवघड जागेचे दुखणे म्हणून पाहिले जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे ही दुखणी कोणत्याही वयात उद्भवू लागली आहे. खासगी रुग्णालयातील आरोग्य तपासणीतील विश्लेषणातून मूळव्याधीचे प्रमाण 60 वर्षांवरील वयोगट आणि 40-49 वर्षे वयोगटात सर्वाधिक असल्याचे समोर आले.
हीलिंग हँड्स फाउंडेशनतर्फे जागतिक मूळव्याध दिनानिमित्त 20 नोव्हेंबरला आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 361 नागरिकांनी तपासणी केली. एकूण रुग्णांपैकी पुरुष 198, तर महिला 163 होत्या.
18 ते 60 पेक्षा जास्त वयोगटांतील रुग्णांची यात तपासणी करण्यात आली. 18 वर्षांखालील 1 टक्का, 18-29 वयोगटातील 15 टक्के, 30-39 मधील 20 टक्के, 40-49 मधील 23 टक्के, 50-59 मधील 14 टक्के व 60 वर्षांवरील 27 टक्के लोकांमध्ये त्रास उद््भवल्याचे दिसून आले.