पुणे : पीएच.डी. प्रवेश आरक्षणानुसारच; विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या सूचना

पुणे : पीएच.डी. प्रवेश आरक्षणानुसारच; विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशप्रक्रियेत आरक्षित जागांवर राज्य शासनाने निश्चित केलेल्या आरक्षणानुसारच विद्यार्थ्यांची निवड करावी आणि आरक्षणात कोणतीही अदलाबदली न करता प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी दिल्या आहेत. पीएच.डी. अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना प्रसिद्ध करून या सूचनांची अंमलबजावणी विद्यापीठातील विभाग, मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांनी करणे आवश्यक असल्याचे परिपत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने प्रसिद्ध केले.

पीएच.डी. प्रवेशासाठी संबंधित मार्गदर्शकांकडे मान्य असलेली प्रवेश क्षमता एकत्रित विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाची पीएच.डी. प्रवेशासाठी काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रवर्गनिहाय एकूण आरक्षणाच्या टक्केवारीनुसार आरक्षणाची अंमलबजावणी शैक्षणिक संस्थांना करावी लागेल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या बीओडी लॉगीनमध्ये उपलब्ध केलेल्या अद्ययावत यादीचा उपयोग करून कोणताही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी मुलाखत पूर्ण झालेल्यांनी त्यांचा अहवाल ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पीएच.डी. प्रवेशासाठी निवड केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी. पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेसाठी नव्याने दिलेल्या विभागीय संशोधन समितीसमोर 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुलाखती घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news