देहूरोड : माणसांची दिवाळी… पक्षी परागंदा

देहूरोड : माणसांची दिवाळी… पक्षी परागंदा

उमेश ओव्हाळ
देहूरोड : यावर्षी कोरोनामुळे दोन वर्षानंतर दिवाळी साजरी करावयास मिळाली. लोकांनी ही मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. पण पक्ष्यांचा सर्वांना विसर पडला. पक्षी आपली घरटी सोडून पळाले आहेत. आता हे पक्षी पुन्हा येण्यासाठी दोन-तीन महिन्याचा काळ वाट पाहावी लागेल. चिमणी, कावळा, पोपट, मैना, असे अनेक पक्षी आपल्या रोजच्या पाहण्यातले. पण हे पक्षी आता कुठे आहेत. हे पक्षी मोठ्या फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरून परागंदा झाले आहेत.

हे चित्र सोमाटणेजवळ चौराई डोंगर परिसर, देहूरोड येथे साईनगर वनविभाग, घोरावडेश्वर डोंगर आणि भक्ती शक्ती(निगडी)जवळील दुर्गा टेकडी येथे पाहायला मिळते. वनविभागाच्या शेकडो एकर जमिनीवर स्थिती जवळपास सारखीच आहे. वन जमिनींचे क्षेत्र राहात्या घरातील व्यक्तींनी बळकावायला सुरुवात केली. वनक्षेत्र आणि निवासी क्षेत्र यांच्यातील मर्यादा कधीच्या संपल्या आहेत.

देशात वन्य जमिनीविषयक अनेक कायदे आहेत. पण हे कायदे अंमलात कोण आणणार. त्यामुळे वन्य संपत्तीची अक्षरशः लूट चालली आहे. आणि त्यात दिवाळी च्या फटाक्यांची भर पडली आहे. फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने पक्षी परागंदा झाले आहेत. सरासरी 5000 पक्षी सध्या गायब आहेत. त्यात चिमणी, घर चिमणी, कावळे, पोपट, मैना, घुबड, बगळे इ. चा समावेश आहे. अलिकडेच या वनविभागात मोर हा राष्ट्रीय पक्षी दिसू लागला होता. पण तो पण आता दिसत नाही.

वनविभागात जंगलात किंवा जंगलाच्याजवळ फटाके वाजविण्यास बंदी आहे. त्यामुळे जंगलाजवळ फटाके वाजविण्याचा प्रश्नच येत नाही. असे असेल तर माहिती घेतली जाईल.
                                                                   – प्रदीप संकपाळ
                                                               आर. एफ. ओ. भांबुर्डा

नागरीकरण वाढल्याने प्राण्यांचे स्थलांतर
पूर्वी या जंगलांमध्ये हौशी पर्यटक वन्य प्राणी पाहण्यास यायचे. आता, या जंगलाचा गावाजवळचा भाग नागरीकरणाने व्यापण्यास प्रारंभ झाला आहे. शेवटी व्हायचे तेच होत आहे. नागरिकरण वाढल्याने जवळपास राहणारे लोक वन्य संपदेवर आक्रमण करतात. त्यामुळे वन्यप्राणी, पक्षी मानवी वास्तव्यामुळे घाबरून येथून दुसर्‍या जंगलाकडे स्थलांतर करू लागले आहेत. येथे वन्य प्राणी आणि पक्षांचे फारच कमी प्रमाणात दर्शन होऊ लागले आहे. याचा विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर होऊ लागला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news