

तळेगाव: तळेगाव रेल्वे स्टेशन येथे मध्यावर एकच ओव्हरब्रिज असल्याने अनेक प्रवाशी चालण्याचे अंतर कमी व्हावे, या हेतूने सिग्नल न पाहता आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत आहेत. हे प्रमाण वरचेवर वाढतच आहे. रेल्वे पोलीसही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवीतहानी होवू शकते. रात्री -अपरात्री हे फारच धोकादायक आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हा कायदेशीर गुन्हा असूनही प्रवासी प्रत्येक लोकल गेल्यावर बेकायदेशीर रुळ ओलांडतात. यासाठी आणखी एक पादचारी पूल रेल्वेने बांधला तर बेकायदेशीरपणे रुळ ओलांडण्याला आळा बसेल.