पिंपरी : ईपीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा

पिंपरी : ईपीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी तील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयावर शहरातील पेन्शनधारकांनी अन्यायकारक परिपत्रकाचा निषेध म्हणून मंगळवार (दि. 10) रोजी मोर्चा काढण्यात आला. तसेच देशभरात याविरोधात आंदोलन करून, परिपत्रकराची जाळून होळी करण्यात आली. पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत ईपीएफओ कार्यालयाला नोव्हेंबर महिण्यात आदेश दिले होते. मात्र कार्यालयाच्या वतीने डिसेंबर महिन्यात काढलेले परिपत्रक पेन्शधारकांची दिशाभूल करणारे असून, अन्यायकारक असल्यामुळे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलना वेळी संघटनेते अध्यक्ष इंद्रसिंग राजपुत, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सचिव श्रीपाद जलवादी, काशिनाथ उगले आदींसह मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते. या वेळी संघटनेच्या वतीने ईपीएफओ कार्यालयाचे सहायक आयुक्त मिनहज असगर यांना निवेदन देण्यात आले.  याविषयी प्रतिक्रिया देताना पेन्शनधारक के.व्ही. कुलकर्णी म्हणाले की, बजाज अ‍ॅाटोमध्ये कामाला होतो. 27 वर्षे कंपनीत सेवा केली. मात्र पेन्शन केवळ बाराशे रुपये मिळते. एवढ्या पैशात काय होणार, माझी बायपास सर्जरी झाली आहे. पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे मिळणार्‍या पेन्शनमध्ये उदरनिर्वाह करणे अशक्य होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news