निगडीतील पादचारी भुयारी मार्गाचे काम संथगतीने

निगडीतील पादचारी भुयारी मार्गाचे काम संथगतीने

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : निगडी येथे ग्रेडसेपरेटरमधील एक्सप्रेस वे ओलांडण्यासाठी पादचार्‍यांसाठी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्याने काम मुदतीमध्ये होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, उड्डाणपूल व रोटरी मार्ग आणि मधुकरराव पवळे उड्डाणपूला दरम्यान, पादचार्‍यांना रस्ता ओलांडता येत नाहीत. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून ग्रेडसेरपेटरमधील एक्सप्रेस वे वरून ये-जा करतात. त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने त्या मार्गाखालून भुयारी पादचारी मार्ग बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

निगडी गावठाण ते एसबीआय बँक या भुयारी मार्गाचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. त्यासाठी एक्सप्रेस वेचा एक मार्ग बंद ठेवण्यात आला होता. एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्‍या बाजूचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे.
पावसाळा सुरू होण्यास थोडा कालावधी आहे. तसेच, 10 जूनला जगद्गगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी शहरात येण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news